पंढरपूर मध्ये "क्लाऊड कम्प्युटिंग युजिंग ए डब्ल्यू एस अझुरे जी सी पी : अ प्रॅक्टिकल एप्रोच" या विषयावर कार्यशाळा संपन्न*

 *पंढरपूर मध्ये "क्लाऊड कम्प्युटिंग युजिंग ए डब्ल्यू एस अझुरे जी सी पी : अ प्रॅक्टिकल एप्रोच" या विषयावर कार्यशाळा संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागामध्ये क्लाउड कम्युटिंग विषयावर शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून  प्रमोद देशमुख निमंत्रित करण्यात आले होते. प्रमोद देशमुख हे सोल्युशन आर्किटेक्ट सायजीनीअस इन्फोटेक, पुणे या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या कार्यशाळेत त्यांनी क्लाऊड कम्प्युटिंग या विषयावर विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील ५५ हून अधिक विद्यार्थी उपस्थित सहभागी झाले होते. 

 ही कार्यशाळा यशस्वी 

करण्यासाठी प्रा. पुनम गवळी यांच्या सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत सहभागी मान्यवरांचे प्रा. सुभाष पिंगळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad