आनंदाचा शिधा देणारे सरकार म्हणजे सामान्यांच्या आधा र - प्रणव परिचारक.
आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशभरातील करोडो माता भगिनींना दिवाळी-दसरा सणापूर्वी भेटवस्तू दिल्याचे प्रणव परिचारक यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले केंद्रीय मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी सबसिडी ₹२०० वरून ₹३०० पर्यंत वाढवली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ₹ ६०० मध्ये एलपीजी सिलिंडर मिळेल.
शिधा आनंदाचा जन सामन्यांच्या सुखाचा... असे म्हणत परिचारक यांनी सामान्य कुटुंबासह शेतकऱ्यांना यंदाचा दिवाळी आणि दसरा आनंदाचा जावो या हेतूने महायुती सरकार तर्फे आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे, असे सांगितले.
दिवाळी आणि दसरा सणानिमित्त अवघ्या १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुतीने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एकूण १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा किटचे वितरण करण्यात येणार आहे.
यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ पदार्थाचा समावेश होता. मात्र आता यामध्ये दोन पदार्थांची भर पडली आहे. या शिध्यात मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे तसेच मंत्री मंडळाच्या बैठकीत एकूण ५३० कोटी १९ लाख आनंदाचा शिधा वाटपासाठी खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. अशी महिती युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली.