*सामाजिक समस्या सोडविण्यासाठी उद्योजकता विकास एक संधी-प्रा. एस. ए. जेऊरकर*
पंढरपूर: प्रतिनिधी
उद्योजकतेचा हे उद्योजकाने करावयाचे एक कार्य आहे. ह्या कार्याची व्याप्ती गुंतवणूक व उत्पादनाची संधी शोधण्यापासून व भांडवल उभारणी करण्यापासून तो व्यवस्थापकांची नेमणूक करण्यापर्यंत काम करत असतो. अलिकडच्या काळात समाजात अनेक अडचणी आहेत. ह्या सोडविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे मत प्रा. ए. एस. जेऊरकर यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.
यावेळी पुढे प्रा. जेऊरकर यांनी सामाजिक अडचणी सोडविण्यासाठी विविध उपकरणे किंवा सेवा प्रणाली कशी उपलब्ध करावी तसेच विविध विषयांवर प्रा. जेऊरकर यांनीच मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटर मधील १४ ग्रुपने "बेस्ट बिझनेस प्लॅन" चे प्रेझेंटेशन दिले. विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना शक्ती वापरून चालू परिस्थितील समस्या विद्यार्थ्यांनी शोधून काढल्या त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. ए. एस. जेऊरकर यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्टार्टअप तसेच उद्योजकता याविषयी संबोधित केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. अतुल आराध्ये यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.