पंढरपूर सिंहगड मध्ये एकदिवसीय कार्यशाळा*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये एकदिवसीय कार्यशाळा*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग व इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट तयारी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.

  पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये २१ सप्टेंबर २०२३ रोजी कोल्हापूर येथील किरण पराडकर यांची "कॅम्पस मुलाखतीची तयारी" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते.

   यामध्ये किरण पराडकर यांनी विद्यार्थ्यांना समूह चर्चा, बायोडाटा, मुलाखत आदींची बाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग व इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

  हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. अतुल कुलकर्णी, राजाराम राऊत आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad