*पंढरपूर सिंहगड मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागात शिक्षण घेत असलेल्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि नैतिक मूल्यासंबंधी विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. दरम्यान द्वितीय वर्षातून तृतीय वर्षात पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडून स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले, सिंहगड महाविद्यालय हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असून हे महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत उत्तम अभियंताच नव्हे तर उत्तम देशाचे नागरिक घडवण्यात तत्पर आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन विभागाची माहिती दिली.
यावेळेस उपस्थित असलेले उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
त्यांनी संबंधित उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.