*जिद्द, जोश आणि जिगर ठेवल्यास आयुष्यात यश निश्चित- डाॅ. अरूण अडसुळ*
○ पंढरपूर सिंहगड मध्ये शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा
पंढरपूर: प्रतिनीधी
आपल्या उणीवा लक्षात आल्यानंतर त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हास शक्य आहे फक्त त्यावर भरोसा असला पाहिजे. आयुष्यातील वेळ कधी निघुन जाईल सांगतात येत नाही त्यासाठी योग्य निर्णय घ्या. आयुष्य वेगवेगळ्या पुस्तकातून जात असते. आयुष्य नेहमी बदल असते. त्यामुळे परिस्थीती कारण सांगत बसु नका. विद्यार्थ्यांनी दैनंदिन वेळ वाचनात घालविणे आवश्यक आहे. थोर महापुरुष व थोर शास्त्रज्ञ यांचे चरित्र वाचावे त्यातूनच प्रेरणा मिळेल. वेळेचे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. आयुष्यात जे ध्येय ठरविले आहे ते ध्येय पुर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. जिद्द असणे आवश्यक आहे. काही तरी करण्याची जिद्द ठेवून आतुन पेटले पाहिजे. अपयश आले तर खचू नका पुन्हा प्रयत्न करा यश मिळेल. बदल हा विचार, वाचनातून होत असतो म्हणून वाचन आवश्यक आहे. स्वतःचे कम्युनिकेशन चांगले पाहिजे, बाॅडी लँग्वेज या गोष्टी आवश्यक यशाच्या शिखरावर पोहोचवण्यास मदत करतात. आयुष्यात चढ उतार येत असतात त्यातुन मार्ग काढा. स्वतःचे अस्तित्व निर्माण झाले पाहिजे असा काम करा. भावनांवर नियंत्रण ठेवा, संगत चागंली ठेवा. जिद्द, जोश आणि जिगर ठेवल्यास आयुष्यात यश निश्चित भेटते असे मत डॉ. अरूण अडसुळ यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे डाॅ. अरूण अडसुळ, संवेदनशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्याम कुलकर्णी, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, प्रा. चंद्रकांत देशमुख आदींच्या हस्ते सरस्वती व डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे डाॅ. अरूण अडसुळ यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. अंजली पिसे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगुन महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगतीचा आलेख सादर केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गुरूराज इनामदार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी: सिंहगड महाविद्यालयात शिक्षण दिनानिमित्त संबोधित करताना डाॅ. अरूण अडसुळ यावेळी समोर उपस्थित विद्यार्थी