लोहा येथील बायपास टू बायपास रस्त्याचा दि.२४ रोजी होणारा भूमीपूजनाचा कार्यक्रम खासदारांनी रद्द करावा -- सकल मराठा समाज बांधवाचे आवाहन
---------------------------------------
लोहा तालुका प्रतिनिधी (शुभम उत्तरवार).
लोहा येथील बायपास टू बायपास रस्त्याचा दि.२४ सप्टेंबर रोजी होणारा भूमीपूजनाचा कार्यक्रम खासदारांनी रद्द करावा असे आवाहन सकल मराठा समाज लोहा तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषदेत केले.
, अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोहा तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे.
येथेच सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दि.२२ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, दि.२४-९-२०२३ रोजी लोहा शहरातील बायबास टू बायपास रस्त्याचा भूमीपूजनाचा कार्यक्रम भाजपाच्या दोन्ही खासदारांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे तेव्हा हा कार्यक्रम घेऊन मराठा समाज बांधवांच्या भावना दुखवू नये ही सकल मराठा समाज बांधवांची विनंती आहे. कार्यक्रम उधळून लावायचा हे आता आम्ही येथे सांगू शकत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनीमी काव्याचा प्रयोग समाज केल्याशिवाय राहत नाही असे ही सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नमूद केले आहे.