*पंढरपूर सिंहगडच्या अणुविद्यूत आणि दूरसंचार विभागामध्ये "व्हर्च्युअल कॅम्पस " उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील अणूविद्युत आणि दूरसंचार विभागातर्फे इटेल्सा च्या वतीने द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. २२ व २३ सप्टेंबर २०२३ रोजी व्हर्च्युअल कॅम्पस चे आयोजन करण्यात आले होते.
या व्हर्च्युअल कॅम्पस चे उद्घाटन प्रमुख पाहणे डाॅ. सागर वाघमारे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अविनाश हराळे, प्रा. अभिजित सवासे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने
कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या व्हर्च्युअल कॅम्पस मध्ये अँप्टीट्युड टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये डाॅ. सागर वाघमारे व प्रा. अभिजित सवासे यांचे मार्गदर्शन लाभले. या व्हर्च्युअल कॅम्पस मध्ये महाविद्यालयातील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या व्हर्च्युअल कॅम्पस मध्ये प्रथम पारितोषिक विजेते आनंद होमकुमंरे, द्वितीय आवंती कोरे या विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
अणुविद्यूत आणि दूरसंचार विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी मान्यवरांचे प्रास्ताविक करून स्वागत केले. व्हर्च्युअल कॅम्पस यशस्वी करण्यासाठी प्रा. स्वप्निल टाकळे, विनायक ऐवळे, सोनाली मोटे, मीनाक्षी जावीर, अशोक कदम, संकेत नागणे, शबनम मुलाणी, ज्ञानेश्वरी जमादार, विशाल ढगे, साक्षी घाडगे, सचिन गोडसे, रोहन गोडसे, प्रशांत पवार, प्रतिक पिसाळ, हर्षद आसबे आणि सिमरण मुलाणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक ऐवळे आणि कु. सोनाली मोटे यांनी केले तर आभार अशोक कदम यांनी मानले.
सिंहगड मध्ये व्हर्च्युअल कॅम्पस चे उद्घाटन प्रसंगी मान्यवर