*पंढरपूर सिंहगडच्या प्रा. अंजली पिसे यांना "बेस्ट टिचर अवॉर्ड"*
पंढरपूर: प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका अंजली पिसे यांना "बेस्ट टिचर अवॉर्ड" प्रदान करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये ५ सप्टेंबर रोजी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण अडसूळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले.
सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका अंजली पिसे यांना "बेस्ट टिचर अवॉर्ड" सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण अडसूळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.
प्रा. अंजली पिसे यांना "बेस्ट टिचर अवॉर्ड" मिळाल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.