लामजन्याच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर...
औसा प्रतिनिधी
लामजना : औसा तालुक्यातील लामजना ग्रामपंचायतीच्या सरपंचावर तहसीलदारांच्या उपस्थितीत अविश्वास ठराव पारित करण्यात आला आहे. उपस्थित चौदापैकी तब्बल तेरा ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाविरोधात मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.
लामजना येथील सरपंच खंडेराव नारायण फुलारी यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या नोटीसवर औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी मंगळवार, दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजता ग्रामसभा
बोलावली होती. या ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्य आहेत. त्यापैकी १४ सदस्य उपस्थित राहिले. सरपंच खंडेराव फुलारी यांनी तहसीलदारांकडे सदर सभा रद्द करण्याची मागणी केली होती. ती मागणी तहसीलदार सूर्यवंशी यांनी फेटाळून लावली. यामुळे या सभेला सरपंच खंडेराव फुलारी हे गैरहजर राहिले. प्रारंभी अविश्वास ठरावाच्या नोटीसमध्ये नमूद असलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यात सरपंच खंडेराव फुलारी हे मनमानी कारभार करीत आहेत. ते इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता काम
करतात, ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी करून घेण्यात रस न दाखविणे, विकासकामाकडे सतत दुर्लक्ष करणे यामुळे त्यांच्यावर विश्वास राहिला नसल्याचे सदस्यांनी सांगितले. गुप्त मतदान घेण्यात आले. अविश्वास ठरावाच्या बाजुने १४ पैकी १३ सदस्यांनी मतदान केले. ठरावाच्या विरोधात एका सदस्याने मतदान केले. सरपंचपदावरील अविश्वास ठराव पारीत होण्यासाठी एकूण ३/४ म्हणजे (१३) तेरा सदस्यांची आवश्यकता आहे. या विशेष सभेत एकूण १३ सदस्यांनी अविश्वास पोलीस संरक्षण ठेवण्यात आले होते.
ठरावाच्या बाजुने मतदान केल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ (३) व तदनंतरच्या सर्व सुधारणां अन्वये हा अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे तहसीलदार सूर्यवंशी यांनी जाहीर केले. सूचक म्हणून बालाजी बब्रुवान पाटील यांनी प्रस्ताव मांडला. त्यास पापामियाँ ईस्माईल पटेल यांनी अनुमोदन दिले. अधासी अधिकारी सूर्यवंशी यांना ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी सहाय केले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस संरक्षण ठेवण्यात आले