पंढरपूर सिंहगडच्या "अद्विक" मधील लेखनास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
पंढरपूर: प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील कुमारी स्नेहल कुंभार हिने मराठी वैचारिक लेखन आणि कुमारी अनुजा पाटील यांनी हिंदी ललित गद्यात्म लेखन केले होते. सदर लेखन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नियतकालिका स्पर्धेत सादर केले होते. या स्पर्धेत स्नेहल कुंभार व अनुजा पाटील यांनी केलेल्या लेखनास प्रथम क्रमांक प्राप्त झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कुमारी स्नेहल कुंभार हिने "मी आणि २०५०" चे विश्व यावर वैचारिक लेखन केले होते. तसेच कुमारी अनुजा पाटील हिने "सुहाने सफर में किस्मत के मारे" यावर हिंदी ललित गद्यात्म लेखन करून स्पर्धेत भाग घेतला होता. या दोन्ही विद्यार्थिनीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नियतकालिका स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील कुमारी स्नेहल कुंभार व अनुजा पाटील यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख, डॉ. शाम कुलकर्णी, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. समीर कटेकर, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, प्रा. अनिल निकम, प्रा. सुभाष पिगंळे, प्रा. अभिजित सवासे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले.