स्वराज्य पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेब पंढरपूर यांना निवेदन* मागील वर्षीच्या अतिवृष्टीतील पिकांच्या मोबदला मिळण्यासाठी दिला सरकारला अल्टिमेट

 *स्वराज्य पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेब पंढरपूर यांना निवेदन*


मागील वर्षीच्या अतिवृष्टीतील पिकांच्या मोबदला मिळण्यासाठी दिला सरकारला अल्टिमेट 



पंढरपूर /प्रतिनीधी


स्वराज्य पक्षाच्या वतीने भंडीशेगाव तालुका पंढरपूर येथील 56 शेतकऱ्यांचे ऑक्टोंबर 2022/ 23 मध्ये अतिवृष्टीमुळे मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे कृषी अधिकारी व तलाठी यांनी पंचनामे करून त्याची यादी मंजूर करून पाठवली होती. एक वर्ष झाले 6लाख 45हजार 300 रुपये ही रक्कम अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्यामुळे, स्वराज्य पक्षाच्या वतीने पंढरपूर तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे की 

या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सरकारला मोबदला देण्याबाबत थेट अल्टिमेट देण्यात आला आहे. यामध्ये येत्या दहा-पंधरा दिवसात शेतकऱ्यांना खात्यावर पैसे नाही जमा झाले, तर येणाऱ्या १०सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत पंढरपूर येथे येणार असून, त्यावेळी त्यांच्यासमोर स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदरचे निवेदन स्वीकारताच पंढरपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार बेल्हेकर यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून चर्चा केली . येत्या शनिवारी भंडीशेगाव येथील तलाठी भाऊसाहेब यांना आदेश देऊन शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर व्हेरिफाय करून येत्या चार दिवसात पैसे सोडण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष गणेश माने. पंढरपूर युवक तालुकाध्यक्ष संग्राम जगताप. भंडीशेगाव चे माजी सरपंच मधुकर गिड्डे. भंडीशेगाव ग्रामपंचायत मा सदस्य रमेश शेगावकर. स्वराज्य पक्ष भंडीशेगाव शाखाप्रमुख विष्णू माने. माढा तालुका निमंत्रक सुनील सुर्वे. युवराज भोसले. कपिल गिड्डे . मिलींद गोरे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad