कर्मयोगी श्रद्धेय स्व.सुधाकरपंत परिचारक(मालक) यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच पंढरपूर मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर(लेन्स सहित) गादेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पार पडले.
या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 470 लोकांची डोळे तपासणी करण्यात आली. यावेळी यामधील 70 लोकांचे डोळ्यांच्या ऑपरेशन करता फॉर्म भरून घेण्यात आले. दृष्टी कमी झालेल्या 250 लोकांना मोफत चष्म्यांचे वितरण जागेवरच करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन युवा नेते प्रणवजी परिचारक मालक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी सरपंच दिपाली बागल, उपसरपंच लता हुंडेकरी, एच.व्ही.देसाई रुग्णालय पुणे चे डॉक्टर, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.खांडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिशा तांबोळी, डॉ.अभिजीत रेपाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव आण्णा बागल, अरुण नागटिळक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, तालुका उपाध्यक्ष संदीप कळसुले, भाजपा प्रभारी अक्षय वाडकर, ग्रा.सदस्य बाळासाहेब बागल, राजेंद्र मस्के, मा.सरपंच दत्तात्रय हुंडेकरी, हरी काका बागल, नामदेव बागल, मोहन आप्पा बागल, संभाजी काका बागल, मा.सरपंच ज्योती बाबर, महादेव फाटे, पै.गणपत बागल, समाधान बागल, संतोष पाटील, विजय भुसनर, कोर्टीचे सरपंच रघुनाथ पवार, महादेव गाढवे आदी व पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग परिवार व प्रणव परिचारक युवा मंच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.