पंढरपूर सिंहगड मध्ये "स्वावलंबी भारत अभियान" संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "स्वावलंबी भारत अभियान" संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये २६ ऑगस्ट २०२३ रोजी "स्वावलंबी भारत अभियान" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या "स्वावलंबी भारत अभियानाची" सुरुवात सरस्वती पूजन प्रसंगी उद्योजक संजय बंगलोरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य चंनवीर बुंकर, श्रीनिवास पाटील, सचिन पारवे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. अतुल आराध्ये आदींच्या हस्ते करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान महाविद्यालयांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

     यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय बेंगलुरकर म्हणाले, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळणे आवश्यक आहे. भविष्यातील दृष्टीकोन लक्षात घेऊन ४-५ विद्यार्थ्यांनी एकञ येऊन स्टार्टअप सुरू करावे. स्टार्टअप सुरू करत असताना अनेक अडचढी निर्माण झाल्यास त्या येणाऱ्या अडचणीवर मात करावी. स्वतःचा उद्योग उभा करून विस्ताराचा आलेख वाढविणे आवश्यक आहे. स्वतः स्वावलंबी होणे आवश्यक असल्याचे मत संजय बंगलोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले. 

 याशिवाय श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमिचे सूत्रसंचालन ऋतुजा गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार ओम इंगळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad