*पंढरपूर सिंहगडच्या दोन विद्यार्थ्यांची "नीलसाॅप्ट प्रा. लि." कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेले धोंडेवाडी (ता.पंढरपूर) येथील सुहास रघुनाथ देठे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग शिकत असलेली पापरी (ता. मोहोळ) येथील रूपाली रामचंद्र चौधरी यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश कराडे यांनी दिली.
"नीलसाॅप्ट प्रा. लि." हि एक नामांकित अभियांत्रिकी सेवा देणारी कंपनी आहे. अभियांत्रिकी सेवा प्रकल्पांसाठी प्रभावी जागतिक वितरण माॅडेल सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञान, डोमेन ज्ञान आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. युएसए, युरोप, मध्य पुर्व, आशिया-पॅसिफिक आणि भारतात या कंपनीचे कार्यालय आहेत. डेटा सुरक्षा आणि गोपनीयता, आय पी संरक्षण, डेटा ट्रान्सफर याशिवाय हि कंपनी माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली जागतिक दर्जाच्या सुविधा देणारी कंपनी आहे अशा या कंपनीत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून ३.५० लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"नीलसाॅप्ट प्रायव्हेट लिमिटेड" कंपनीत निवड झालेल्या सुहास देठे व रूपाली चौधरी यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अमोल कांबळे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.