पंढरपूर सिंहगड ३ विद्यार्थ्यांची "जाबिल इंडिया" कंपनीत निवड*

 *पंढरपूर सिंहगड ३ विद्यार्थ्यांची "जाबिल इंडिया" कंपनीत निवड*




पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले कुमारी रुक्मिणी सुनिल शिर्के, नागेश बाळासाहेब गिरीगोसावी आणि सुरज अंकुश शेजाळ या तीन विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन "जाबिल इंडिया" कंपनीत निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

     "जाबिल इंडिया" हि एक अमेरिकन कंपनी असुन जगभरातील नामांकित इलेक्ट्रॉनिक्स फाॅर्च्युन पहिल्या पाचशे कंपन्या पैकी एक कंपनी आहे. या कंपनीची सेंट पीटर्सबर्ग, फ्लोरिडा येथील गेटवे परीसरात मुख्यालय असुन हि कंपनी अँटोमोटिव्ह, ड्रोन, सप्लाय चेन, ऑटोमेशन, सेमी कंडक्टर आदी क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे. या कंपनीचे ३० देशांमध्ये सुमारे १०० हून अधिक कार्यालय असुन जगभरात दोन लाख साठ हजार कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत. अशा या कंपनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील रुक्मिणी सुनिल शिर्के, नागेश बाळासाहेब गिरीगोसावी आणि सुरज अंकुश शेजाळ यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असुन कंपनीकडून ३.६० लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

    "जाबिल इंडिया" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad