पंढरपूर सिंहगडच्या ज्ञानेश्वरी गिरीबे यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड*

 *पंढरपूर सिंहगडच्या ज्ञानेश्वरी गिरीबे यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड*




पंढरपूर: प्रतिनिधी



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या ज्ञानेश्वरी काशिनाथ गरिबे हिची "इम्प्रेशन सिस्टम्स अ‍ॅण्ड इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली आहे.

    "इम्प्रेशन सिस्टीम्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीची स्थापना टेक्नोक्रॅट्सनी २००५ मध्ये मटेरियल हँडलिंग सिस्टमच्या ऑटोमेशनच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. ऑटोमेशन हे उत्पादन उद्योगाचे भविष्य आणि गरज आहे. कुशल कर्मचार्‍यांची सतत वाढणारी किंमत, ग्राहकांकडून वाढलेली मागणी, उच्च पुनरावृत्ती उत्पादन अचूकतेची गरज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढत्या स्पर्धात्मक बाजार परिस्थितीमुळे उत्पादन उद्योग मनुष्यबळ-आधारित उत्पादन क्रियाकलापांच्या पारंपारिक दृष्टिकोनातून स्वयंचलित उत्पादनाच्या वापराकडे वळला आहे. 

    हि कंपनी हँडलिंग सिस्टीम्स आणि प्रोसेस ऑटोमेशन या क्षेत्रात उत्पादने आणि मॅन्युफॅक्चरिंग लाइन्सचा एक अग्रगण्य पुरवठादार बनण्याचे उद्दिष्ट ठेवून सतत पुढे जात आहे. कंपनीची उत्पादने खाद्य आणि पेये, ऑटोमोटिव्ह, हेवी फॅब्रिकेशन उद्योग, शिपयार्ड, बांधकाम उपकरणे, पवन आणि उर्जा, वाहतूक यंत्रे (मेट्रो आणि डिझेल लोकोमोटिव्ह सारखी) यांसारख्या क्षेत्रात अग्रेसर आहे. अशा या कंपनीत कुमारी ज्ञानेश्वरी काशिनाथ गरिबे हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ३ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

   "इम्प्रेशन सिस्टीम्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड" कंपनीत निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वरी गरीबे हिचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad