*करकंब येथे संभाजी भिडेचा मोर्चा काढून निषेध विविध संघटनांच्या वतीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी*
*करकंब - महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिंडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी आज करकंब येथे विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढून करण्यात आली.*
*टिळक चौकातून बसस्थानकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर,सावता परिषदेचे मृदुल माळी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप,बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,उपसरपंच आदिनाथ देशमुख,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आनंद लोंढे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल शेळके,दिगंबर मिसाळ-तालुकाध्यक्ष माळशिरस,शंकर नागणे-कार्यालयीन सचिव,राजेश पवार-ता.संघटक माळशिरस,दलित महासंघाचे नारायण गायकवाड अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तानाजी गायकवाड विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिंदे, करकंब शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, राजाभाऊ खारे, आकाश शिंदे, शंकर राऊत, सतिश खारे, श्री . अविनाश जाधव श्री . सावता खारे, अरुण बनकर, तुकाराम माळी, राहुल लिंगे (माळी महासंघ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), बंडू शिंदे, बसपचे नितीन गायकवाड, पिंटू वाफळकर, सुर्यंकात वाफळकर, ज्योतीराम सिदवाडकर, विक्ष्वजीत शिंदे, तानाजी जाधव, रामेश्वर खाडे, अविनाश जाधव, विजय जाधव, विकास शिंदे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे, आदी सहभागी झाले होते. मोर्चा बसस्थानक येथे आल्यानंतर संभाजी भिडेच्या राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह व देशद्रोही वक्तव्याचा निषेध व्यक्त करणारी भाषणे अनेकांनी केली.सर्वांनीच भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर करकंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश तारू यांना निवेदन देण्यात आले.*