पंढरपूर सिंहगड मधील वैभव ननवरे यांची मंञालयात महसुल साहाय्यक आणि विक्रीकर विभागात कर साहाय्यक पदी निवड*

 *पंढरपूर सिंहगड मधील वैभव ननवरे यांची मंञालयात महसुल साहाय्यक आणि विक्रीकर विभागात कर साहाय्यक पदी निवड*


पंढरपूर: प्रतिनिधी




एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अभियांञिकीचे शिक्षण पुर्ण केलेले खळवे (ता.माळशिरस) येथील वैभव दत्तात्रय ननवरे यांची मंञालयात महसुल साहाय्यक आणि विक्रीकर साहाय्यक पदावर निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.

     २०१६ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून अभियांञिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर २०१७ पासून एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा, गट ब पी एस आय, एस टी आय आणि ए एस ओ या परीक्षा वैभव दत्तात्रय ननवरे यांनी दिल्या होत्या. सदर पदाची परीक्षा ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेचा निकाल जुलै २०२३ मध्ये जाहिर झाला. या परीक्षेत वैभव दत्तात्रय ननवरे यांची मंञालयात महसुल साहाय्यक आणि विक्रीकर विभागात कर साहाय्यक पदावर निवड झाली असुन वैभव ननवरे हे मंञालयात विक्रीकर सहाय्यक पदाची नोकरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad