*पंढरपूर सिंहगड मध्ये इन्व्हेस्टमेंट जागरूकता कार्यक्रम" संपन्न*
पंढरपूरः प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयात "इन्व्हेस्टमेंट जागरूकता कार्यक्रम" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, मार्गदर्शक स्नेहविर तोमर, सौरभ माने, डाॅ. चेतन पिसे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यादरम्यान एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शक स्नेहविर तोमर व सौरभ माने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात स्नेहविर तोमर यांनी आर्थिक नियोजन कसे असावे, गुंतवणूक करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, गुंतवणुकीचे उत्तम पर्याय याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. समाधान माळी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गुरूराज इनामदार सर यांनी केले.