*पंढरपूर सिंहगड मध्ये "जागतिक उद्योजकता दिवस" साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक उद्योजकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
जागतिक उद्योजकता दिवसाचे औचित्य साधून एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या विचाराने पुढे जाणे, आपले कौशल्य पणाला लावणे, धोका पत्करणे, अशक्य गोष्टींनाही शक्य करण्यासाठी प्रयत्न करणे, बहुतेकांसाठी ज्या गोष्टी स्वप्नातही शक्य नसतात त्या प्रत्यक्षात मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, स्वप्न पाहणे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, आशा-निराशा यश-अपयश संकट-समाधान न्याय-अन्याय योग्य-अयोग्य अशा सगळ्या गोष्टींना मनाची कोणतीही चलबिचल न होऊ देता एकसारख्याच विचाराने आणि धैर्याने सामोरे जाण्याची जिद्द असणे, कोण म्हणत शक्य नाही असं प्रश्न स्वतःलाच विचारने, हा प्रश्न विचारताना स्वतःच्याच क्षमतेला आव्हान देणे अशा अनेक गोष्टींमधून उद्योजक घडत असतो. असे मत उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.
यावेळी डॉ. अतुल आराध्ये व डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नवनवीन उद्योग व स्टार्टअप बद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय सुप्रसिद्ध उद्योजक यांची चिञफीत दाखविण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. स्वप्निल टाकळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार नागेंद्रकुमार नायकुडे यांनी मानले.