चेअरमन अभिजीत पाटील यांनी माचनूर येथील सिद्धनाथाचे घेतले दर्शन*

 *चेअरमन अभिजीत पाटील यांनी माचनूर येथील सिद्धनाथाचे घेतले दर्शन*



प्रतिनिधी मंगळवेढा/- 


श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे सध्या मंगळवेढा तालुक्यात जोरदार तयारी करताना दिसत आहेत.


गेल्या काही दिवसांमध्येच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवेढा येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून शरद पवार यांचे मन जिंकले होते.


तसेच शरद पवार यांना सर्व पक्षातील सदस्य, पदाधिकारी सोडून जात असताना अभिजीत पाटील हे मात्र निष्ठेची भूमिका बजावताना दिसत आहेत.


पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री अभिजीत पाटील यांनी आज दिनांक २१ऑगस्ट रोजी माचनूर येथील प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.


यावेळी मंदीर समितीचे पदाधिकारी, तसेच माचनूर गावचे सदस्य, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.