धावपळीच्या जीवनात महिलांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज- डाॅ. ज्योती शेटे*

 *धावपळीच्या जीवनात महिलांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज- डाॅ. ज्योती शेटे*



*पंढरपूर सिंहगड मध्ये "मुलींचे आरोग्य व जीवनशैली" या विषयावर व्याख्यान*


पंढरपूर: प्रतिनिधी


मुलींचे आरोग्य व जीवनशैली, आहारातील समतोल, मानसिक संतुलन, बौद्धिक प्रगती तसेच कर्करोग जनजागृती, व्यायाम, मानसिक ताणतणाव अशा विविध विषयांवर डाॅ. ज्योती शेटे यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये "गर्ल्स फोरम" आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींशी हितगुज करित धावपळीच्या जीवनात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यासाठी संभाव्य उपयायोजना याविषयीही भाष्य केले. यावेळी विभागातील सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी "आरोग्य व जीवनशैली" या विषयावर डाॅ. ज्योती शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, व्याख्यात्या डाॅ. ज्योती शेटे, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे, आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

     महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. ज्योती शेटे यांचा प्रा. अंजली पिसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

  या कार्यक्रमाच्या नियोजानाकरिता प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अनिता शिंदे, प्रा. सोनाली गोडसे, प्रा. धनश्री भोसले, प्रा. निशा करांडे, माधुरी यादव, रूपाली खंडागळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 


मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंता गव्हाणे व वरदा बिडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अनिता शिंदे यांनी मानले.र

येथील सिंहगड काॅलेज मध्ये उपस्थित विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना डाॅ. ज्योती शेटे समोर उपस्थित विद्यार्थिनी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad