*पंढरपूर सिंहगडच्या १२ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
देशातील विविध नामांकित कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होत असून "टीसीएस" कंपनीत पंढरपूर सिंहगड कॉलेज मधील १२ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधुन नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
"टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून "टीसीएस" चा उल्लेख केला जातो.
"टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या कंपनीत पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये अंतीम वर्षात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या "टीसीएस" कंपनीकडून मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीतून विद्यार्थ्यांना कंपनीत आवश्यक असलेली शैक्षणिक गुणवत्ता, उपयुक्त ज्ञान, शिस्त या सर्व गोष्टींवर "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या कंपनीतील मुलाखत घेणारे अधिकारी प्रभावित झाले. कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण सिंहगड काॅलेज मधील विद्यार्थ्यांकडे दिसुन आल्याने महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात एखतपुर (ता. सांगोला) येथील मानसी सोमनाथ नवले, इसभावी (ता.पंढरपूर) येथील सिमंतिनी कुंभार, पंढरपूर येथील ज्योती रमेश पवार, पंढरपूर येथील सानिया शाहरूख तांबोळी, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात म्हसवड (ता. माण) इजाज यासीन आतार, पंढरपूर येथील आसावरी अनंत बोक्षे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कुर्डूवाडी (ता. बार्शी) येथील गायञी संजय पाटील, पंढरपूर येथील मोहम्मदशोहेब फारूक शेख, सोहाळे (ता. मोहोळ) येथील अनिकेत बाळासाहेब जगताप, बोंडले (ता. माळशिरस) येथील ञिमुर्ती बलभीम शिंदे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रमोद भिमराव राऊत, गीतांजली भारत जठार आदी १२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून टीसीएस कंपनीत निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून ३.३७ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय विद्यार्थी व पालकांच्या विश्वास पाञ ठरले आहे. महाविद्यालयाचे प्लेसमेंट व निकाल हे प्रत्येक वर्षे उत्कृष्ट लागत आहे. महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार मिळाला असुन प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या निकालात पंढरपूर सिंहगडचे अनेक विद्यार्थी सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा प्लेसमेंट व शैक्षणिक आलेख उंचावत असल्याने विद्यार्थी व पालकांमधुन पंढरपूर सिंहगडला
सर्वाधिक पसंतीचे महाविद्यालय म्हणुन ओळखले जात आहेत.
"टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेतील सर्व पदाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.