*पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची "ट्रिमसीस कंट्रोल सोल्युशन्स" कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील अभिषेक बापूसाहेब भुसे, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील राहुल अंकुश बनसोडे आणि सुरज अंकुश शेजाळ यांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन "ट्रिमसीस कंट्रोल सोल्युशन्स" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
"ट्रिमसीस कंट्रोल सोल्युशन्स" हि पुणे येथे स्थायिक असुन सुमारे पाच दशकापूर्वी उद्योगांचे ऑटोमेशन सुरू झाले होते. "ट्रिमसीस कंट्रोल सोल्युशन्स" कंपनीत आधुनिक डिजिटलायझेशन तंत्रज्ञान नियंत्रण ठेवण्यासाठी काम करत आहे.औद्योगिक व्यवसायासाठी संपुर्ण डिजिटल एंटरप्राइझ तयार करण्यासाठी "ट्रिमसीस कंट्रोल सोल्युशन्स" कंपनी कार्यरत आहे. अशा या कंपनीत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २.७८ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"ट्रिमसीस कंट्रोल सोल्युशन्स" कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे, प्रा. दत्तात्रय कोरके, राजाराम राऊत आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.