भरीव शैक्षणिक योगदानामुळे विद्यार्थ्यांचा कल स्वेरीकडे
- हंटर सेंटर फॉर इंटरप्रेनरशिपचे डॉ.श्रीवस सहस्त्रनामम्
सोबसच्या अधिकाऱ्यांची स्वेरीला सदिच्छा भेट
पंढरपूर- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे ज्ञान देवून विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल करणाऱ्या स्वेरीकडे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरच पुणे-मुंबई अशा मोठ मोठ्या शहरांमधील विद्यार्थी व पालकांचे लक्ष स्वेरीकडे लागले आहे. स्वेरी ही संस्था स्थापनेपासून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देत आली आहे. स्वेरीतील पंढरपूर पॅटर्न वर आधारित शिक्षण पद्धती, आदर, शिस्त व संस्कार तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम उत्तम व अनुकरणीय आहेत. स्वेरीची शिक्षणसंस्कृती पाहता स्वेरीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक योगदान महत्वाचे ठरणार आहे.’ असे गौरवोदगार ग्लासग्लो- स्कॉटलंड (युनायटेड किंगडम) मधील हंटर सेंटर फॉर इंटरप्रेनरशिपचे व्याख्याते डॉ.श्रीवस सहस्त्रनामम् यांनी काढले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला व स्वेरी सोबस सेंटरला ग्लासग्लो-स्कॉटलंड (युनायटेड किंगडम) मधील हंटर सेंटर फॉर इंटरप्रेनरशिपचे व्याख्याते डॉ. श्रीवस सहस्त्रनामम यांच्यासह सोशल इंटरप्रेनरशिप, मुंबई व स्कूल ऑफ मॅनेंजमेंट लेबर स्टडीज् , टाटा इन्स्टिट्यूट चे अधिष्ठाता प्रा. सत्यजित मुझुमदार, टिस इनक्युब फौंडेशन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय दीक्षित, टीम ऑफ टिस इनक्युब फौंडेशन महाराष्ट्रचे आमोद चंद्रात्रे, व व्यवस्थापिका निकिता नार्वेकर हे अधिकारी ‘रुरल इंटरप्रेनरशिप इको सिस्टम डेव्हलपमेन्ट’ यावर आधारित दोन दिवसाच्या भेटीसाठी आले होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सोबसच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील उद्योजकता विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी ते आले होते. त्यांनी पहिल्या दिवशी पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) मधील गुळ निर्मिती केंद्राला व मसाला निर्मिती कारखान्याला भेट दिली तर दुसऱ्या दिवशी त्यांनी पंढरपूर तालुक्यामधील लघु उद्योजकांना स्वेरीमध्ये आमंत्रित करून उद्योजकतेबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. दि.२५ जानेवारी २०२१ रोजी संस्थेत स्वेरीज 'सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स'ची स्थापना करण्यात आली. तेंव्हापासून या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकता विकासाचे विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील नवउद्योजकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करणे इ.कार्ये या सेंटरच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहेत. दि.२६ जून २०२१ रोजी 'न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तारापुर, महाराष्ट्र साईट' सोबत ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा सामंजस्य करार करण्यात आला. आजपर्यंत जवळपास २९ संशोधन प्रकल्पांसाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा संशोधननिधी राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, ए.आर.डी. बी., मॉडरॉब, भाभा अणुसंशोधन केंद्र, डी. एस.टी., युजीसी, बी.आर.एन.एस.,डी. बी.टी. आदी संस्थांकडून प्राप्त झाला असून या निधी मधूनच कांही संशोधन प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर कांही प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या निधीच्या माध्यमातून 'स्वेरी' मध्ये विविध अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग लॅब, चेन टेस्टिंग लॅब, व्हायब्रेशन अनालिसिस लॅब, एन.डी. टी. लॅब, लोडींग फ्रेम फॅसिलिटी, ऍडव्हान्स्ड डिझाइन अँड सिम्युलेशन लॅब, अँटेना डिझाइन लॅब इ. चा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांसोबत सुमारे ५० पेक्षा जास्त सामंजस्य करार करण्यात आले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या बौद्धिक विकासास आणि तांत्रिक कौशल्य वाढीस चालना मिळत आहे. स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी असणाऱ्या संशोधनपूरक वातावरणामुळे आणि प्रोत्साहनपर धोरणामुळे आत्तापर्यंत ७९० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. स्वेरीतील टेक्नो-सोसायटल च्या शोधनिबंधांना आंतरराष्ट्रीय 'स्कोपस' चा दर्जाही प्राप्त झाला आहे. आजपर्यंत सुमारे ४६ पुस्तके प्रकाशित झाली असून सुमारे २७ पेटंट्स देखील दाखल करण्यात आले आहेत. स्वेरीतील संशोधनाला चालना देण्यासाठी विविध ठिकाणी होणाऱ्या संशोधन कार्यशाळेत येथील प्राध्यापक, संशोधक सहभागी होत असतात आणि अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करत असतात. सोबसच्या आलेल्या पाहुण्यांनी स्वेरीच्या संशोधन विभागाला तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सोबस इन्साईटस् फोरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, डॉ.विद्याराणी क्षीरसागर, सोबस सेंटरचे गिरीश संपत, प्रशांत मांडके, नितिन कुलकर्णी, डॉ.एम.एम.आवताडे यांच्यासह स्वेरीचे इतर प्राध्यापक उपस्थित होते.