*सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
कॅशेक इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीची स्थापना १९९५ साली पुणे येथे करण्यात आली असून हि कंपनी सागरी प्रकल्प, रस्ते, पुल, इमारतीच्या संरचना आणि कॅड सेवांमध्ये एकाच छताखाली डिझाइन आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीतून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयात नेहमीच अग्रेसर असुन विद्यार्थ्यांना नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी देण्यासाठी सिंहगड कॉलेज मध्ये संपूर्ण तयारी करून घेतली जाते. याच अनुषंगानेच चालू शैक्षणिक वर्षांत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असतानाच दिघंची (ता. आटपाडी) कुमारी उल्का उन्मेष शेटे, कण्हेर-इस्लामपूर (ता. माळशिरस) येथील सोमनाथ महादेव मिसाळ, पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील ॠतुजा राजेंद्र नाईकनवरे, पंढरपूर येथील आरती संजय लावंड आणि पाटकुल (ता. मोहोळ) अक्षय मोहन माळी यांची पुणे येथील कॅशेक इंजिनिअर्स प्रा. लि. कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून मोफत तीन महिने इंटर्नशिप होणार असुन इंटर्नशिप झाल्यानंतर कंपनीकडून ३ लाख वार्षिक पगार मिळणार आहे.
पुणे येथील कॅशेक इंजिनिअर्स प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अमोल कांबळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.