महिला सबलीकरण काळाची गरज- दर्शना कुलकर्णी* ○ पंढरपूर सिंहगड मध्ये राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम

 *महिला सबलीकरण काळाची गरज- दर्शना कुलकर्णी*


○ पंढरपूर सिंहगड मध्ये राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम



पंढरपूर: प्रतिनिधी 



संपूर्ण जगाचा विचार करता स्त्री-पुरुषांच्या स्थान व दर्जामध्ये विविधता आढळून येते. सतत महिला सबलीकरण या संदर्भात अनेक व्यासपीठांवर चर्चा होताना दिसते. “महिला सबलीकरण, म्हणजे मानवी व्यवहारांच्या सर्वच पातळींवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.” महिलांना पुरुषांच्या बरोबरीने कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तरातून समान संधी, स्थान व अधिकार देऊन महिला सबलीकरण करणे शक्य आहे. समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरुवात करतो; पण याच वेळी या समाजाला प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का? ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का?स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. महिलांच्या स्वातंत्र्य व अधिकाराविषयी कळकळ व्यक्त केली जाते. असे असतानाही निर्भया कांड किंवा कोपर्डीसारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडतात आणि अशा वेळी आपल्यासमोर महिलांचे प्रश्न बिकट समस्या बनून उभ्या राहतात. त्यावर उपचार म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरण आवश्यक असल्याचे मत दर्शना कुलकर्णी यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.

  महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन आयोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण व शिक्षण कार्यक्रम तसेच ऑल महाराष्ट्र धांगता असोसिएशन तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट पंढरपूर यांच्यावतीने पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दर्शना कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या सुरुवात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, दर्शना कुलकर्णी, ऋतुजा शिंदे, प्राचार्या स्मिता नवले आदींच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांच्या हस्ते दर्शना कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

     यावेळी राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचा जीवन पट उपस्थित विद्यार्थिनीना सांगण्यात आला. दरम्यान अशोक भोसले, विजय हणमंते, अतुल चव्हाण, साक्षी पवार, आदित्य चव्हाण, समृद्ध कुलकर्णी, संग्राम गायकवाड यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. धनश्री भोसले, विद्यार्थिनी प्रतिनिधी ऋतुजा शिंदे आदींसह महाविद्यालयातील व स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad