*पंढरपूर सिंहगडच्या प्रशांत चौघुले यांची "आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर" पदी निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केले (ईश्वर वठार ता. पंढरपूर) येथील प्रशांत लहू चौगुले यांची "आयडीबीआय (इंडस्ट्रिअल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया)बँकेत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर" पदी निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग शिक्षण घेत असतानाच प्रशांत चौगुले यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. 2 जुलै 2023 मध्ये आय. बी. पी. एस. अंतर्गत घेण्यात आलेल्या "आयडीबीआय बँकेच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या पदांसाठी पूर्ण देशभरातून 56 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
या परीक्षेत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रशांत चौगुले उत्तीर्ण होऊन "आयडीबीआय बँकेच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर" पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशांत चौगुले यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.