*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे आषाढी वारीत श्रमदान*
○ सिंहगड कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकी
पंढरपूर: प्रतिनिधी
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे पायी चालत लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात. या दरम्यान पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांची सेवा करण्याची संधी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांकडून प्रत्येक वर्षी करण्यात येत असते. यावर्षी हि सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज ची श्रमदानाची परंपरा काय ठेवली असून जवळपास सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी वारी मध्ये सेवेच्या रूपात श्रमदान केले असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना आवश्यक असलेली माहिती तसेच सेवा सुविधांची माहिती देण्याचे काम सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. याशिवाय कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते. या पोलीस प्रशासनाला सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून पोलीस मिञ म्हणून जबाबदारी पार पाडली.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. चंद्रकांत देशमुख, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. सुमित इंगोले, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. सिद्धेश्वर गोंगौडा, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे सह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.