*पंढरपूर सिंहगडच्या साक्षी जवंजाळ ची वुमेन इन टेक साठी निवड*
○ राज्यातील साक्षी जवंजाळ ठरली पहिली विद्यार्थिनी
पंढरपूर: प्रतिनिधी
एन एक्स पी हि एक भारतातील संस्था असुन या संस्थेने "वुमेन इन टेक" हा कार्यक्रम आयोजित केला होता. या संस्थेने महिला आणि मुलींना शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी कौशल्य व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काम करत आहे. अशा या संस्थेने पहिल्या बॅचसाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे भारतातील ५० टाॅप मुलींना इंडस्ट्रियल व्हिजिट करता बोलवले होते. या व्हिजिट मध्ये पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेली कुमारी साक्षी दत्तात्रय जवंजाळ हिची महाराष्ट्र राज्यातून वुमेन इन टेक कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२२ मध्ये एनएक्सपी इंडिया कंपनी द्वारे डब्ल्यू आय टी कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमात उच्च प्रतिभावान महिला अभियंत्यासाठी त्यांच्या अभियांञिकी अभ्यासाच्या अगदी सुरवातीच्या टप्प्यावर हा एक अतिशय अनोखा शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन कार्यक्रम १६ जुन २०२३ रोजी दिल्ली येथे घेण्यात आला.
यामध्ये लीडरशिप टीमद्वारे एन एक्स पी विहंगावलोकन, लॅब व्हिजिट, सुरक्षा एम्बेडेड सिस्टम्सवरील तांत्रिक सत्र मध्ये एन एक्स पी च्या कार्य संस्कृतीवर एच आर सत्र तसेच नोएडा साइट टूर ते फिटनेस सेंटर, एन एक्स पी चे उत्पादन डेमो शोकेस याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
अभियांञिकीचे शिक्षणामध्ये बी ई अथवा बी टेक करत असलेल्या महिला विद्यार्थिनी कडूनू नामांकन मागवण्यात आले होते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग मधील ३ -या सेमिस्टर आणि भारतातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच हजार पेक्षा जास्त महिला अभियंत्यांनी यामध्ये भाग घेतला होता. यामधुन फक्त ५० टाॅप महिला अभियंत्यांना संधी मिळाली असुन यामध्ये एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील कुमारी साक्षी दत्तात्रय जवंजाळ हिची निवड झाली आहे.
वुमेन इन टेक कार्यक्रम सहभागी होऊन पहिल्या बॅचसाठी महाविद्यालयातील विद्यालयातील महिला अभियंता देणारे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर सिंहगड हे एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज ठरले आहे.
साक्षी जवंजाळ हिच्या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस दिल्या आहेत.