स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या रामकृष्ण साळुंखे यांची ‘वेबटेक डेव्हलपर्स’ या कंपनीत निवड!


स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या रामकृष्ण साळुंखे यांची ‘वेबटेक डेव्हलपर्स’ या कंपनीत निवड!



पंढरपूरः ‘वेबटेक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकीत कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील रामकृष्ण भारत साळुंखे यांची कॅम्पस मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी.रोंगे यांनी दिली.

         ‘वेबटेक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या नामंकित कंपनीच्या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या रामकृष्ण साळुंखे या विद्यार्थ्याची निवड केली असून त्यांना वार्षिक रु.४ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या रामकृष्ण भारत साळुंखे यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad