*पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांची "पायबायथ्री" कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी ( ता पंढरपूर) येथील एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन "पायबायथ्री कन्सल्टिंग सर्विसेस प्रा. लिमिटेड" या कंपनीत मध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
"पायबायथ्री" हि कंपनी पुणे शहरात कार्यरत असून, या कंपनीचे मुंबईत सुद्धा ऑफिस आहे. हि कंपनी क्लाऊड ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अॅनालिटिक्स, अँप मॉडर्नायझेशन , क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा ऑन क्लाऊड, स्नोफ्लेक या उल्लेखनीय क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे. याशिवाय हि कंपनी स्नोफ्लेक फिन-ऑप्स आणि क्लाऊड-मायग्रेशन करीता प्रॉडक्ट्स देखील बनविते . पायबायथ्री हि अक्सेंच्युर कंपनीसारख्या मल्टिनॅशनल कंपनीत २० हुन अधिक वर्ष काम केलेल्या दिग्गज थॉट लीडर्स नि स्थापित केली आहे. अशा या कंपनीत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेले टाकळी (ता.पंढरपूर) येथील शुभम संजय माळी, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील मगरवाडी-चंद्रापुरी (ता. माळशिरस) येथील नेहा सुरेश सोनवणे, सुपली (ता.पंढरपूर) येथील ज्ञानेश्वर काशिनाथ राऊत, वाघोली (ता. मोहोळ) येथील शंकर विलास चव्हाण आणि पापरी (ता.मोहोळ) येथील रूपाली रामचंद्र चौधरी आदी पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३.८८ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. या कंपनीत बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील निलेश देशमुख हे त्यातील एक फाऊंडर आहेत. पायबायथ्री हि कंपनी लवकरच अमेरिका व ऑस्ट्रेलिया मध्ये कार्यरत होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
"पायबायथ्री" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे "पायबायथ्री" कंपनीचे अध्यक्ष दर्शन वाघचौरे, सीटीओ हिमांशू शहा, महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे, संदीप लिंगे, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.