आमदारकीच्या डोहाळेमुळेच निवडणुक लादली : भालके*

 *आमदारकीच्या डोहाळेमुळेच निवडणुक लादली : भालके*



पंढरपूर / प्रतिनीधी - कारखान्याच्या बाबत अफवा पसरवून सभासदांना खोटंनाट सांगितले जात आहे. पण ही सभासद जनता सुज्ञ आहे. विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. यांना आमदारकीच ढवाळ लागल्यामुळे हि निवडणुक लावली आहे. हे ढवाळ पूर्ण करण्यासाठी सभासदांची दिशाभूल केली जात आहे. दिशाभूल करण्याची हि प्रवृती वाईट असल्याने दिशाभुल करणारी हि प्रवृती यापुढे फोपावू देवू नका असे प्रितपादन विठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी केले.


 पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेप्रसंगी भगीरथ भालके बोलत होते. यावेळी शिवेसेना नेते साईनाथ अभंगराव, कल्याणराव काळे, ॲड.गणेश पाटील, सुधाकर कवडे, माजी संचालक विलास भोसले, दिनकर कदम, समाधान फाटे, नितीन बागल, शिवशंकर चव्हाण, नारायण गायकवाड, मारूती जाधव, मोहन नागटिळक, शकुर बागवान, सिध्देश्वर पवार, उत्तम नाईकनवरे, माऊली जवळेकर, महादेव देठे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पुढे बोलताना भालके यांनी विरोधी पॅनेलवर जोरदार टिका करून विरोधकांच्या खोटेपणाचा फुगा या निवडणूकीत फुटणार असून मगच त्यांची जागा त्यांना समजणार आहे असे सांगितले.


 यावेळी सुधाकर कवडे, समाधान फाटे, नितीन बागल, माजी संचालक विलास भोसले, नारायण गायकवाड, साईनाथ अभंगराव यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी आपली मनोगते व्यक्त करून विरोधी पॅनलच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad