*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना "स्किलॅथाॅन २०२३" स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय "स्किलॅथाॅन २०२३" स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
उद्यम फाऊंडेशन इनक्युबेशन सेंटर, कौशल्य विकास केंद्र, जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण तसेच प्रशिक्षण कार्यालयाच्या वतीने सोलापूर येथील नाॅर्थकोट प्रशालेच्या परीसरात स्किलॅथाॅन २०२३ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली.
या स्पर्धेत जिल्ह्य़ातील विविध महाविद्यालयातील जवळपास २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी (ता. पंढरपूर) येथील महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील नियंता शेंडगे, आशुतोष कोरे, प्रदीप खुर्द आणि श्रेयश करंजकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे.
पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाशङ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. अतुल आराध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.