सर्व समावेशक व विकासात्मक चेहरा म्हणजे अनिल बनसोडे - डाॅ. प्रभाकर माळी*

 *सर्व समावेशक व विकासात्मक चेहरा म्हणजे अनिल बनसोडे - डाॅ. प्रभाकर माळी*




लक्ष्मी दहिवडी: प्रतिनिधी


समाजात वावरत असताना अनेक वेळा निराशाच पदरी पडते परंतु समोरच्या माणसाला समजुन घेत असताना त्याचे ऐकून घेणे गरजेचे असते. ऐकून घेऊन बोलणं हे सुसंस्कृतपण लक्षण आहे आणि तो सुसंस्कृतपणा अनिल बनसोडे मध्ये दिसून येतो. दिसण्या पेक्षा असणे यामध्ये खूप फरक आहे. पण अनेक वेळा दिसते तसे नसते तुमच्या दिसण्यापेक्षा असणे खुप महत्त्वाचे असते. यातुन तुमचे असणे आयुष्यात तुम्हास योग्य पदावर घेऊन जात असते. काम करत असताना परिस्थितीच भान ठेवून वाटचाल केली तर उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी अशक्य असे काहीच नसते. सामाजिक कार्यक्रमात स्त्रियांचा वाटा सुद्धा यामध्ये अपेक्षित आहे. सामाजिक समता दूर करा महिलांना सन्मान हक्क देणे गरजेचे आहे

मुलींना शिक्षण देणे आवश्यक असून अनेक तरुण व्यसनाच्या आहारी व अंधश्रयाच्या आहारी गेल्याने अनेक समाजाचा विकास झाला नाही. अंधश्रद्धे पासून दुरू राहणे आवश्यक आहे. मोबाईल अतिरिक्त वापर टाळणे, व्यसनापासून दूर होण्याची गरजेचे आहे. व्यसनामुळे अनेकांची कुटुंब उध्वस्त झाले असुन तरुणांना योग्य मार्गदर्शन व सर्व समावेशक विकासात्मक पाऊल पुढे घेऊन जाणारे नेतृत्व अनिल बनसोडे असल्याचे मत सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष व सूतगिरणीचे विद्यमान चेअरमन डाॅ. प्रभाकर माळी यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.



    शुक्रवार दिनांक २ जुन रोजी लक्ष्मी दहिवडीचे सुपुत्र महात्मा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी भुषण, सूतगिरणीचे चेअरमन डाॅ. प्रभाकर माळी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

   यावेळी सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डाॅ. प्रभाकर माळी, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी, माजी नगरसेवक शिवाजी बनकर, गजानन बनकर, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ राऊत, युवक नेते मधुकर बनसोडे, प्रा. नीलकंठ लिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अँड. शिवानंदन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी बोलताना म्हणाले, शासकीय सेवेत अनिल बनसोडे देखील सामाजिक काम करत असल्याने पोलीस खात्याची मान उंचावली आहे. चांगले उपक्रम राबविण्यात असल्याने त्यांचे कौतुक केले पाहिजे. महात्मा फुले यांच्या आचार विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवत आहेत. अभिमानास्पद बाब असून महापुरुषाचे विचार समाजात रूजण्यचचे काम अनिल बनसोडे करत आहेत. हे करत असताना माती असलेली नाळ त्यांनी जोपासली आहे. मी पण ग्रामीण भागातील असल्याने मला येथे आल्याने मला खुप आनंद झाला असल्याचे मत पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.

  यावेळेस माजी नगरसेवक शिवाजी बनकर, गजानन बनकर, पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रातील गुणवंत शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा फेटा, शाल, हार व एक वृक्षाचे झाड देऊन सन्मान करण्यात आला.

   अतिशय स्तुत्य उपक्रम अनिल बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आल्याने लक्ष्मी दहिवडीतील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

   या दरम्यान गावातील विविध समाजातील सामाजिक संघटनेकडून अनिल बनसोडे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. 

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमाशंकर तोडकरी, अँड. शिवानंद पाटील, सुतार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सुतार, भीमाशंकर तोडकरी, दत्तात्रय बनसोडे सावकर, राजेश तोडकरी, विलास बनसोडे, काळे सर, चाॅद तांबोळी, मनसेचे अविनाश बनसोडे, नितिन टाकळे, मधुकर जुंदळे, नागेश कुंभार, किरण बनसोडे, अझर नदाफ, आशिफ तांबोळी, शहाजी सोनवले, बाबा वाघमारे, दत्तात्रय कोरे आदींसह महात्मा फुले युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब बनसोडे, प्रा. विठ्ठलराव टाकळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल बनसोडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad