कार्तिकी यात्रा 2023: पंढरपूर नगर परिषदेतर्फे यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन
पंढरपूर, दि.28 :- भाविकांची मोठी गर्दी होणार हे गृहीत धरून पंढरपूर नगर परिषदेतर्फे यात्रेकरूंना व भाविकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक नम्र आवाहन करण्यात आले आहे.
सदर आवाहनामध्ये, पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे. या भूवैकुंठ नगरीमध्ये येणार्या भाविक, भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे. या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणे करिता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे अशी नम्र विनंती केली आहे.
🌸पालन करावयाच्या सूचना खालील प्रमाणे 🌸
१) यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची सोय नवीन पुला शेजारी सोलापूर रोड लगतच्या भक्ती सागर ६५ एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे.
२) उघड्यावर शौचास बसू नये. प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा.
३) शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा.
४) पत्रावळी व द्रोणचा वापर :- जेवणाकरिता थर्माकोल प्लास्टिकच्या पत्रावळी वापरू नये. त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणार्या पत्रावळ्यांचा द्रोणचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा. पर्यावरणाचा समतोल साधावा.
५) कचरा व्यवस्थापन :- आपल्या मठ/संस्था इत्यादी मध्ये निर्माण होणारा कचरा/ पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे अन्न इत्यादी दोन मोठ्या टिपा मध्ये ओला व सुका असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा.
६) नदीचे व बोर चे पाणी पिऊ नये. नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे.
७) शिळे अन्न, नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये.
८) धोकादायक इमारतींमध्ये राहू नये.
९) कोरोना (कोविड-१९):- या आजाराचे प्रतिबंधक उपाय योजना अनुषंगाने यात्रेकरूंनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल वापरणे सॅनिटायझर चा वापर करणे व सुरक्षित अंतर राखणे इत्यादी सूचनांचे पालन करावे.
१०) पार्किंग व्यवस्था ठिकाणे :- अंबाबाई पटांगण, संत गजानन महाराज मठा मागे, इसबावी विसावा मंदिरा समोर, सांगोला रोड एम. एस. ई. बी. समोर कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली, डॉक्टर आंबेडकर नगर मरीआई पटांगण, कराड रोड गौतम विद्यालय जागेत वेअर हाऊस जवळ इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे