पंढरपूर सिंहगडचे प्रा. दिपक गानमोटे यांना पी एच. डी. प्रदान
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत असलेले प्रा. दिपक गानमोटे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयात पी. एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. दिपक गानमोटे यांनी "प्रोव्हर्ब्स इन शॉर्ट फिक्शन: अ स्टडी ऑफ सिलेक्ट शॉर्ट स्टोरीज इन इंग्लिश" या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला.
यासाठी त्यांना संगमनेर कॉलेज (स्वायत्त) संगमनेर येथील प्रा. उमेश शिवराम जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी या विषयामध्ये एकूण पाच कथा प्रकारांमधील म्हणींचा सांस्कृतिक अभ्यास करून वेगवेगळ्या संस्कृतीमधील म्हणी समजून घेण्यात येणाऱ्या अडचणी व त्या कशा समजून घ्याव्या या बाबतचे विश्लेषण केले आहे. प्रा. दिपक गानमोटे यांनी पी. एच. डी. पदवी संपादन केल्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, डॉ. संपत देशमुख, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. चेतन पिसे, डॉ. शाम कुलकर्णी, डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील शिक्षक व शिकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.