रांझणीत जि.प.प्राथमिक शाळा वर्ग खोली उद्घाटन तसेच सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न...
पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चार नविन वर्ग खोल्या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री वसंत नाना देशमुख यांच्या सातत्य पाठपुराव्यामुळे पूर्ण झाल्या होत्या आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीतउद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे युटिपेन शुगरचे चेअरमन श्री उमेशराव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदे रांझणी शाळेच्या शिक्षिका सौ.देठे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम ही संपन्न झाला.या कार्यक्रमास राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब काळे त्याच बरोबर शिक्षकसंघ चे रामभाऊ यादव उत्तमराव जमदाडे ,केंद्र प्रमुख कांतीलाल वाघमारे,श्री नागनाथ क्षीरसागर माजी चेअरमन उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सिताराम दांडगे सर उपाध्यक् श्री साहेबराव ढोले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री मारुती लिगाडे सर ,शालेय समितीचे सदस्य महादेव घाडगे, विजय दांडगे, नवनाथ फरकंडे रांझणी गावचे सरपंच सौ रेश्मा राजाराम शिंदे व उपसरपंच श्री मारुती भाकरे ग्रामपंचायत सदस्य श्री अकबर मुलानी, श्री दीपक पंडित, श्री दादा ढोले, श्री श्रीमंत दांडगे, श्री शहाजी घोडके सर श्री हनुमंत ढोले, विविध कार्य सोसायटीचे चेअरमन श्री भारत दांडगे, श्री महादेव ढोले, अनिल भाकरे श्री विष्णू काळे श्री दत्तात्रय दांडगे ,बापूसो दांडगे.श्री गणेश पंडित,शिवाजी अवताडे, दिगंबर मोरे, गणेश घाडगे श्री महादेव सप्ताळ , संदिप गांडुळे यांच्या सह जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री अनिल कांबळे, श्री संजय मोरे, श्री ज्ञानेश्वर मोरे, श्री पवार सर व सर्व सहशिक्षिका समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.