सोशल मिडीयाचा करिअरसाठी उपयोग करा- संजय होन पंढरपूर सिंहगड मध्ये "विंग्ज २ के २३ उत्साहात संपन्न

 सोशल मिडीयाचा करिअरसाठी उपयोग करा- संजय होन 


पंढरपूर सिंहगड मध्ये "विंग्ज २ के २३ उत्साहात संपन्न.



पंढरपूर: प्रतिनिधी


सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टींची माहिती मिळत असते. आपल्या सभोवताली काय सुरू आहे, याची अपडेटेड माहिती सद्या मुलांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून तात्काळ मिळत आहे. शहरी भागातील मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुलांमध्ये कष्ट करण्याची क्षमता जास्त आहे. जरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी फारसे येत नसले तरी इंग्रजी भाषेची मनात भिती बाळगू नका. युट्यूब सारख्या माध्यमातून आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करून शतकता. सद्या फिल्डवर काम करण्यासाठी टेक्नॉलॉजी खुप महत्वाची असुन पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे आयोजित केलेल्या विंग्ज २ के २३ या राज्यस्तरीय इव्हेंट मधुन आपल्या आयडिया समोर येतात आणि यातूनच ज्ञान भर पडत असते यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करिअरला नवीन संधी उपलब्ध करून देऊन त्यांचा उपयोग करिअरसाठी करण्याचे मत संजय होन यांनी यादरम्यान बोलतात व्यक्त केले.

     एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार २७ मे २०२३ रोजी राज्यस्तरीय विंग्ज २ के २३ इव्हेंट  आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंट चे उद्घाटन पांडुरंग पालेकर, संजय होन, मारूती कौटकर, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, शिक्षक प्रतिनिधी प्रा. राहुल शिंदे आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

  यावेळी उपस्थित मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, मारूती कौटकर, पांडुरंग पालेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कंपनीत मुलाखत देत असताना कोणते कौशल्य आवश्यक आहे. मुलाखतीला आत्मविश्वासाच्या जोरावर कसे सामोरे जायचे याविषयी मार्गदर्शन केले.

    या राज्यस्तरीय इव्हेंट मध्ये विजयी स्पर्धकांना प्रमाणात व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्य़ातील जवळपास २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश म्हमाणे, शिवाणी फुले, ऋतुजा गायकवाड, आदिती जाधव या विद्यार्थ्यांनी केले तर उपस्थितांचे आभार ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad