*रोटरी क्लबकडून "गर्भाशय व स्तन कॅन्सर" तपासणी शिबिराचे आयोजन*
पंढरपूर: प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून मंगळवार दिनांक २३ मे २०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव येथे "गर्भाशय व स्तन कॅन्सर" तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
भारतात कॅन्सरचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असून बदलती जीवनशैली हे त्यांचे प्रमुख कारण आहे. अशा वेळी योग्य निदान झाल्यास व आधुनिक उपचार पद्धतीच्या मदतीने कॅन्सर बरा होऊ शकतो यासाठी वेळीच तपासणी व उपचार आवश्यक असतात.
यासाठी सामाजिक भावनेतून रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून ग्रामीण भागातील महिलां करिता २३ मे २०२३ रोजी गादेगाव (ता.पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात "गर्भाशय व स्तन कॅन्सर" तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात डाॅ. सुलोचना कोडलकर, डाॅ. अनिता तांबोळी, डाॅ. संगिता पाटील, डाॅ. क्षितिजा पाटील व डाॅ. उषा अवधूतराव आदी डाॅक्टर तपासणी करून उपचार करणार आहेत.
हे शिबिर २३ मे २०२३ रोजी सकाळी सकाळी १० ते ०२ या कालावधीत गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित केले असुन या शिबिराचा गादेगाव परिसरातील महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब पंढरपूर कडून करण्यात आले आहे.