पंढरपूर रोटरी क्लबच्या माध्यमातून साकारली चिमण्यांची घरटी ○ चिमण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम

 पंढरपूर रोटरी क्लबच्या माध्यमातून साकारली चिमण्यांची घरटी

○ चिमण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम 



पंढरपूर: प्रतिनिधी


वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. मात्र, याही परिस्थितीत कृत्रिम घरट्यांद्वारे चिमण्यांचे संवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम पंढरपूर रोटरी क्लबने राबविला असुन कृत्रिम घरटी तयार करण्यासाठी चिमुकल्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. करांडे यांनी दिली.

बुधवार दिनांक १७ मे २०२३ रोजी पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये रोटरी क्लब पंढरपूर यांच्या माध्यमातून मोफत कृत्रिम घरटी तयार करणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन कुमारी श्रावणी माळी व श्रवण माळी यांच्या मधुर वाणीतून स्वागत गीत गायन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळेस उपस्थित प्रमुख पाहुणे श्रीकांत बडवे यांचे रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

   निसर्गरम्य वातावरण, वाडे व कौलारू घरांमुळे शहरात चिमण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. वाडे व कौलारू छतांच्या अडगळीत चिमण्यांना घरटी बांधण्याची संधी होती. परंतु, शहरीकरणामुळे कौलारू घरे जाऊन त्या जागी सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्याने चिमण्यांना घरटी बांधावयास जागाच राहिली नाही. त्यातच वृक्षतोडीमुळे चिमण्यांची अडचण झाली. मात्र, निसर्ग साखळीतील एक घटक असलेल्या चिमण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे व रोटरी क्लब पंढरपूर यांनी सामाजिक जाणिवेतून मोफत घरटी तयार करण्याचा निर्धार करून कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेला लहान लहान चिमुकल्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. घरटी बनविण्यासाठी लागणारे प्लायवुड, फेव्हिकॉल व इतर साहित्य रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांनी उपलब्ध करून दिले होते. दरम्यान लहान मुलांना रोटरी क्लब कडून खाऊ वाटप करण्यात आला.

  या कार्यशाळेत पंढरपूर व सांगोला परिसरातील लहान लहान मुलांनी सहभाग घेतला होता. हि कार्यशाळा यशस्वी रोटरी क्लबचे उपक्रमशील अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, डाॅ. चेतन पिसे, प्रा. अभिजित सवासे, डाॅ. शिरीष कुलकर्णी, रो. डाॅ. संगीता पाटील, प्रा. निशा करांडे, प्रा. प्राजक्ता कुलकर्णी, प्रकाश शेटे प्रेमचंद चोले, नवनाथ माळी आदींसह रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलपूर रोटरी क्लब कडून घेण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी सोबत रोटरी क्लब ऑफ पंढरपूर अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे  व इतर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad