*पंढरपूर सिंहगड मध्ये बौद्धिक संपदा हक्क या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त बौद्धिक संपदा हक्क या विषयावर व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
हे व्याख्यान विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा हक्क या विषायासंदर्भात अधिक माहिती मिळावी यासाठी हे व्याख्यान आयोजित केले होते.
या व्याख्यानाची सुरुवात कार्यक्रमाचे वक्ते सिद्रामप्पा शिवशंकर धरणे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रमेश पाटील, प्रा. अमोल कांबळे, प्रा. उदयकुमार फुले आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने व्याख्यानाची सुरुवात
करण्यात आली.
या व्याख्याना दरम्यान बोलताना बौद्धिक संपदा हक्क या विषयावर सविस्तर माहिती दिली धरणे यांनी दिली. बौद्धिक संपदा कशी मिळवावी ह्याबद्दल सांगितले. त्यासाठी लागणारी वेगवेगळी कागदपत्रे समजावून सांगितली. त्यांनी नवीन बौद्धिक संपदा कशी शोधता येईल हेही सांगितले. पुढे त्यांनी त्यांना बौद्धिक संपदा मिळवण्यात आलेल्या अडचणी व त्यावरील उपाय योजना कशी केली हे सांगितले. त्यांच्या अनुभवातून मुलांना बौद्धिक संपदा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
हा कार्यक्रम सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर आणि रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर सिंहगड मध्ये आयोजित केला होता.
या व्याख्यानात २५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिशा होनमाने हिने केले.
या व्याख्यानाचे नियोजन डॉ. रमेश पाटील यांनी केले त्यांना डॉ. अतुल अराध्ये, प्रा. उदयकुमार फुले, प्रा अमोल कांबळे, प्रा. अंजली पिसे, प्रा. प्रदीप व्यवाहारे , प्रा. बाळकृष्ण जगदाळे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले.