लोह्यात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य मोटारसायकल रॅली "सियारम चंद्र की जय" घोषणांनी शहर दुमदुमले

 लोह्यात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य मोटारसायकल रॅली "सियारम चंद्र की जय" घोषणांनी शहर दुमदुमले


*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



 लोहा येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने शहरातून रामनवमी निमित्त मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या प्रतीमेची रॅली रामभक्तांनी आयोजित केली होती. रॅलीत भगवे ध्वज असलेल्या मोटारसायकली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रंभू सियारम चंद्र की जय घोषणांनी लोहा शहर दुमदुमले. रॅलीत शहरासह तालुक्यातील रामभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

               लोहा शहरात रामनवमी निमित्त अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने दि. ३० रोजी गुरुवारी सकाळी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी विहिप व बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष अंबादास पाटील पवार, पै. गणेश पाटील कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. प्रारंभी जुना लोहा शहरातील मारुती मंदिरात श्रीफळ फोडून रॅलीस आरंभ करण्यात आला. जुना लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर कै. विश्वनाथराव नळगे विद्यालय, विठ्ठलवाडी येथील मस्जिद, नगरेश्वर मंदिर, भाजी मंडई, पोलिस ठाणे, बसस्थानक, आंबेडकर नगर, स्मशानभूमी पुल मार्गे शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीतील रामभक्तांनी अभिवादन केले. सदर रॅली बाजार कमान, बाजार समिती, शिक्षक कॉलनी मार्गे तलाठी कॉलनी येथील राम मंदिरात महाप्रसाद वाटप करून विसर्जित करण्यात आली. ठिकठिकाणी अनेक राजकीय, सामाजिक संघटना पदाधिकारी तसेच मान्यवरांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीत भगवे ध्वज, बनायेगे मंदिर गीते तसेच "प्रभू सियाराम चंद्र की जय" घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. लोहा पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

              याप्रसंगी विहीप चे अंबादास पाटील पवार, पै. गणेश पाटील कल्याणकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक भास्कर पाटील पवार, कांता सावकार बि डवई, माजी नगरसेवक युवराज वाघमारे, मिलिंद पाटील पवार, मिलिंद खरोटे, राजेश पाटील कुटे, चंद्रकांत यादव, सचिन वड, सोमनाथ शिरोळे, राहुल फुके, योगेश धुडके, दीपक कंधारकर, सुदर्शन अंबेकर, किशन वड, राहुल गोडबोले, बाळू पाटील गायकवाड आदींसह शहर तसेच तालुक्यातील बहुसंख्येने रामभक्त उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad