नाफेड मार्फत हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा बालाजी बच्चेवार ...
नायगांव ता.प्र.
(परमेश्वर पा.जाधव)
नाफेड मार्फत आठ राज्यस्तरीय संस्थामार्फत हरभरा खरेदी होणार असल्याचे शासनाने सांगितले व तशा पद्धतीची नोंदणी शेतकऱ्यांनी करावी अशी आव्हान बच्चेवार यांनी केले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यावर वेळोवेळी संघटने येत आहेत माघेच कोरोना महामारीतून हवालदिल झालेला शेतकरी कसाबसा सावरत कोरोना महामारीतून बाहेर पडताच बळीराजावर पुन्हा एक अतिवृष्टी सारख्या मोठ्या संकटास सामोरे जावे लागले आहे. खरीप पिक तर अतिवृष्टीमुळे नष्ट झाले पण आता चना पीक जवळपास बऱ्यापैकी असून त्यात सरकारने नाफेड केंद्र लवकर सुरू करत नाही मागील वर्षी नाफेड चना खरेदी 5 मार्चला सुरू झाले होते परंतु यावर्षी सरकारने अद्याप खरेदी ची तारीख दिलेली नाही.
नांदेड जिल्ह्यात चार संस्थामार्फत जवळपास 60 प्रस्तावना नाफेडमार्फत खरेदी करण्याचे प्रस्ताव गेलेले आहेत परंतु अद्याप पर्यंत जवळपास 60 प्रस्तावा पैकी एकही खरेदी केंद्र सुरू करण्यास नाफेडणे मान्यता दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे शासनाचा हरभऱ्यांचा हमीभाव 5335 रुपये आहे, तर बाजारामध्ये हाच चना 4500 रू भावाने व क्विंटली तीन ते चार किलो कट्टी व शेकडा एक रुपया टक्के हे शेतकऱ्यांच्याच मालाच्या पैशातून कट करून अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या संदर्भात आजच जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामार्फत ही संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेऊन तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आले आहे .नाफेडचे ब्रांच मॅनेजर मुंबई यांनाही नांदेड जिल्ह्यातील सर्वांच्या सर्व प्रस्तावांना तात्काळ मान्यता देऊन लवकरात लवकर नाफेड मार्फत खरेदी करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.