कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय म्हणजे महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी असुन येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येईल -- संजय भोसीकर
----------------------------------------
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय म्हणजे परिवर्तनाची नांदी असुन येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येईल असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी लोहा येथे काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केले.
लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर यांचा देऊळगल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी ६८ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तानाजी मच्छेवार, बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक केशवराव शेटे ,माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील नळगे , माजी नगरसेवक उत्तम महाबळे, मिडिया पोलिस सोशल क्लबचे तालुकाध्यक्ष विलास सावळे, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा संघटक तथा साहित्यिक बापू गायखर, पत्रकार संजय कहाळेकर, विनोद महाबळे, मारोती कांबळे, विश्वनाथ कांबळे, पत्रकार शुभम सावकार उत्तरवार, शिवराज दाढेल, बगाडे ,रामगिरवार ,यांच्या सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा संजय भोसीकर यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व पेढा भरवुन भव्य सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रमुख मार्गदर्शन करताना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर म्हणाले की, आज दुग्धाशकर दिवस आहे एकिकडे लोहयात काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर यांचा वाढदिवस साजरा होत आहे तर दुसरीकडे कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रांधेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे . काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम आहे. देशात व राज्यात जनता आता काँग्रेसच्या पाठिमागे उभी राहत आहे.
शिवाजी आंबेकर हे काँग्रेसचे जेष्ठ नेते देशाचे माजी गृहमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांच्या तालमित तयार झालेले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत माजी आमदार ईश्वरराव भोसीकर , माजी नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार, माजी सभापती कै. माधवराव पांडागळे, व्यंकटराव मुकादम , व माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे व ते लोहा तालुक्यातील काँग्रेसचे एकमेव जेष्ठ नेते आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे व्यापारी, शेतकरी , पत्रकार आदी मंडळी आहेत नव्या पिढीने त्यांच्याकडून शिकले पाहिजे व पक्ष निष्ठा काय असते ते त्यांच्याकडून शिकली पाहिजे .आज दुग्धाशकर दिवस आहे कसबा येथे काँग्रेस पक्षाने विधानसभेची जागा भाजपाकडून खेचून आणली आहे कसबा चा विजय म्हणजे महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी आहे व येणाऱ्या काळात राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता येणार आहे असे संजय भोसीकर म्हणाले.