स्वेरीमध्ये येत्या १८ मार्चला माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन


स्वेरीमध्ये येत्या १८ मार्चला माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन




पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शनिवार, दि.१८ मार्च २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता स्वेरी अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांकरिता असलेल्या ‘ऋणानुबंध २०२३’ या मेळाव्याचे स्वेरीमध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

          ‘ऋणानुबंध २०२३’ या मेळाव्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे मनमुराद चर्चा, आपआपसात सुसंवाद, नव्या विचारांबरोबरच जुन्या आठवणींच्या शिदोरीची देवाण घेवाण करणार असून आपण काम करत असलेल्या कंपनीत अथवा नोकरीत येत असलेले अनुभव कथन हे व असे अनेक भरगच्च कार्यक्रम या मेळाव्यात असणार आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर व उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. अविनाश मोटे यांनी ‘स्वेरी अभियांत्रिकीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.’ असे आवाहन केले आहे. एकूणच सदर मेळाव्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे तसेच गतकाळात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावाही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पदवी अभियांत्रिकीच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८ पासून ते गतवर्षीपर्यंत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वेरीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने विद्यार्थी पुणे, मुंबई, बेंगलोर तसेच भारतातील अन्य प्रमुख शहरांमध्ये व परदेशात स्थायीक झालेले माजी विद्यार्थी देखील मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एकूणच ‘ऋणानुबंध २०२३’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुना चिवचिवाट स्वेरी कॅम्पसमध्ये नव्याने घुमणार आहे. स्वेरीचे अधिकाधिक विद्यार्थी हे पुणे, मुंबई, हैद्राबाद, बेंगलोरमध्ये स्थायिक झाले असून या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी होता यावे म्हणूनच येत्या शनिवारी (दि.१८ मार्च, सकाळी ११:०० वा.) या मेळाव्याचे आयोजन केले आहे. ‘ माजी विद्यार्थी मेळाव्यासंबंधी अधिक माहीतीसाठी ९९२३४०३७०८, ९८८१७७६१९६ व ८६९८३०३३८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.’ असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.