*चौकी धर्मापुरी तालुका कंधार येथील अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण व २६ वा वर्धापन दिन साजरा.*
कंधार ता.प्र.शिवराज पाटील इंगळे
चौकी धर्मापुरी तालुका कंधार येथे ह.भ.प स्वर्गीय मामासाहेब मारतेळकर यांच्या हस्ते चालू केलेला.अखंड हरीनाम सप्ताह व भव्य दिव्य ज्ञानेश्वरी गाथा पारायण सोहळा दिनांक.११/०२/२०२३ ते १९/०२/२०२३या कालावधीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी काला व शिवजयंतीच्या मुहूर्तावर काला आल्याने शिवव्याख्याते,भागवताचार्य,ह.भ.प हरी महाराज अंजनसोंडा यांच्या रसाळ वाणीतून कृष्णाच्या लीला व शिवचरित्र गोड वाणीतून त्यांनी सांगितले.या सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आनंदा व्यंकटराव पा.इंगळे,मधुकर बालाजी पा.कळकेकर, उमाकांत ञ्यंबक पा.इंगळे(नवनियुक्त सरपंच),बालाजी पंढरी पा.कळकेकर, पञकार शिवराज माधवराव पा.इंगळे,सुरेश नामदेव पा.इंगळे,संतोष बालाजी पा.कळकेकर,बालाजी रामकिशन पा.इंगळे,दिगांबर विनायक पा.इंगळे, श्रीनिवास माधवराव पा.इंगळे,गोविंद शंकर पा.कळकेकर,आयनाथ गोविंद पा.कळकेकर,भास्कर विठ्ठल पा.इंगळे, सदाशिव पुंडलिक पा. कळकेकर, भगवान बालाजी पा.इंगळे,ज्ञानेश्वर पंढरी पा.कळकेकर,विलास पंडित पा.कल्याणकर, सुभाष जळबा पांचाळ व सर्व गावकऱ्यांनी परीश्रम घेतले