आर्य वैश्य समाजाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्न करणार नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे तिरुपती येथे प्रतिपादन

 आर्य वैश्य समाजाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्न करणार        नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे तिरुपती येथे प्रतिपादन

तिरुपतीत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अधिवेशन व भक्त निवासाचे थाटात भूमिपूजन 

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



सात्विकता, प्रामाणिकता, लिनता,  सभ्यता, दानशूरता असा असलेला आर्य वैश्य समाज आणि या समाजात मला पुन्हा पुन्हा जन्म मिळावा अशी मी देवाजवळ सदैव प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील तळागाळात असलेल्या आर्य वैश्य समाजातील सर्व समाज बांधवांच्या उन्नतीसाठी आपला सदैव प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती या ठिकाणी केले. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने भरविण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारी मंडळाच्या दुसऱ्या अधिवेशनात आणि महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा भक्तनिवास भूमिपूजन सोहळ्यानिमित्त तिरुपतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तिरुपतीत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या नियोजित भक्त निवासाचे भूमिपूजन आणि दुसरे अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. तिरुपती येथील महासभेच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून जवळपास एक ते दीड हजार पदाधिकारी समाज बांधव, महिला पदाधिकारी उपस्थित होते  महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे आर्य वैश्य समाजात एक नवचैतन्याची नांदी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यसभेचे माजी खासदार टी.जी. व्यंकटेश, हिंगणघाट येथील आमदार समीर कुणावार, आंध्र प्रदेश पर्यावरण व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष गुबा चंद्रशेखर, तिरुपती येथील आमदार भुमन्ना करूणाकर, काशी अन्नसत्रचे समिती सदस्य विलास बच्चू, तिरुपती येथील महापौर श्रीशा यादव, येलुरी लक्षमय्या, देवकी व्यंकटेश ,दिलीप कंदकुर्त, भावनाशी श्रीनिवासा, एकनाथ मामडे, पशुपती गोपीनाथ, डी. नरसीमल्लू, अखिल भारतीय महिला महासभेच्या अध्यक्षा माधुरी कोल्हे, राज्याच्या महिला अध्यक्ष सुलभाताई वट्टमवार, डॉ. डी. आर. मुखेडकर, एडवोकेट केसरला चंद्रशेखर, पी. विकास, जी. के  रोनी, सुभा राजू, एन. शिवकुमार यांच्यासह आंध्र प्रदेश तिरुपती येथील व महाराष्ट्रातील विविध मान्यवरांच्या साक्षीने भूमिपूजन सोहळा व अधिवेशन पार पडले.

महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार, राज्यसंघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष अनिल मनाठकर, महासभेचे उपाध्यक्ष राजू मुक्कावार, सुधीर पाटील, नंदकुमार मडगुलवार, यांच्यासह महासभेचे राज्य कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नाला मोठे यश आले 

महासभेने जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमानुसार येत्या वर्षभरामध्ये विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. त्यात तिरुपती येथे भक्त निवास उभारणे,पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे,ओबीसी प्रवर्गामध्ये समाजाचा समावेश करणे, महाराष्ट्रात मोजकेच  वधू-वर परिचय मेळावे भरविणे, आर्य वैश्य समाजातील गरजवंतांना घरकुल मिळवून देणे असा पंचसूत्री कार्यक्रम महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी जाहीर केला आहे. या पंचसूत्रीला बेटी बचाव, बेटी पढाव हा जोड दिला जाणार आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आंध्र प्रदेशात राज्य गीत म्हणून जाहीर करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा हे गीत प्रारंभी सादर करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. सपनाताई मुनगंटीवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. अधिवेशनाचे प्रास्ताविक महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई यांनी केले असून त्यात त्यांनी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने राज्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. समाज हितासाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा सदैव कटिबद्ध असल्याचे सांगून महासभेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले. 

राज्यात समाज बांधवांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात महासभेने आवाज उठवला असून महासभेने सर्व सामान्य समाज बांधवांना न्याय दिला असल्याचेही याप्रसंगी सांगितले आहे.

बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार यांनी तिरुपती येथे बांधण्यात येणाऱ्या भक्त निवासाची सविस्तर माहिती दिली.

महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी महासभेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली.

अनेक मान्यवरांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले उपस्थित मान्यवरांचा महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला असून भक्त निवासाच्या बांधकामासाठी ज्या समाज बांधवांनी आर्थिक सहकार्य केले आहे त्यांचाही महासभेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नांदेड ग्रामीण जिल्ह्याने 604 रक्त बॉटल संकलित करून प्रथम क्रमांक पटकाविला. बीड जिल्ह्याने 551 रक्त बॉटल संकलित करून द्वितीय क्रमांक, तर परभणी जिल्ह्याने 492 रक्त बॉटल संकलित करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. विशेष प्राविण्यासह परळी वैजनाथ, बाराळी, बोधडी या गावाला पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार यांनी 2022 23 या कालावधीत महासभेच्या विविध उपक्रमाची माहिती आपल्या व विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून अतिशय उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी केलेल्या कामाचा आढावा पुस्तक रूपात तयार करून नामदार सुधीर मनगुंटीवार यांच्या हस्ते त्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. नामदार सुधीर मुनगुंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने घेण्यात आलेल्या वृक्षारोपणात हिंगोली जिल्ह्याने 4 हजार वृक्षाचे रोपण करून प्रथम क्रमांक पटकावला. 697 झाडे लावून लातूर जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर नांदेड ग्रामीण जिल्ह्याने 663 वृक्षारोपण करून तृतीय क्रमांक मिळवला आहे. याप्रसंगी राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सुमित रुद्रवार, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष बाबुराव नालमवार, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संजय कौलवार, वर्ध्याचे जिल्हाध्यक्ष अनंता भोगावार, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजय कुंचनवार, नांदेड शहराचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुकावार, जालना जिल्ह्याचे अध्यक्ष रत्नाकर कापतवार, परभणीचे जिल्हाध्यक्ष बालाजी डुबेवार, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष सचिन गुंडेवार, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माणिकवार, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तम्मेवार, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ अनिल माडुरवार, नाशिकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरगावकर, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष संजय पालतेवार, नागपूरचे जिल्हाध्यक्ष दीपक निलावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूर येथील सचिन लादे यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांनी केले आहे..........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad