कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा एसएससी निकाल शंभर टक्के*

 *कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा एसएससी निकाल शंभर टक्के*



पंढरपूर : *कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला* या प्रशालेने दरवर्षीप्रमाणे *शंभर टक्के* निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेने उज्ज्वल यश संपादन केले आहे.


यामध्ये *कु. सई हनुमंत चव्हाण* हिने 90.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. *आदित्य नितीनकुमार शेटे* याने 90 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर *समृद्धी सुधाकर धाईंजे* हिने 89 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.


यावर्षी प्रशालेमधून एकूण २४ विद्यार्थ्यांनी *विशेष प्राविण्य* मिळवून यश संपादन करत प्रशालेचा शंभर टक्के निकाल कायम राखला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई, रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके व सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad